नाशिक : बँकेत ग्राहकास गंडा घालणारा भामटा ताब्यात

नांदूरशिंगोटे बँक www.pudhari.news

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा
परिसरात गेल्या महिनाभरापासून मोठ्या प्रमाणावर चोरीच्या प्रकारामध्ये वाढ झाली आहे. आता बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकास काढलेले पैसे मोजत असताना दोघा अज्ञात इसमांनी 22 हजार रुपयांना फसवल्याची घटना नुकतीच घडली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. रफीक हुसैन जाफरी (38, रा. कौसा, ता. जि. ठाणे) असे संशयिताचे नाव आहे.

अमोल रवींद्र वाघचौरे (रा. नांदूशिंगोटे) हे बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी गेले होते. खात्यातून 60 हजार रुपये काढले. त्यात 500 रुपयांचा एक व 100 रुपयांचा एक असे दोन बंडल असल्याने 500 रुपयांचा बंडल डाव्या मांडीखाली ठेवून 100 रुपयांच्या बंडलमधील रक्कम मोजत असताना दोघे अज्ञात इसम त्यांच्याजवळ आले. त्यांनी वाघचौरे यांना बोलण्यात गुंतवून 50 हजारांच्या बंडलमधील 500 रुपयांच्या 44 नोटा काढून घेत 22 हजार रुपये घेऊन पोबारा केला होता. महाराष्ट्र बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका भामट्याला पकडण्यात यश आल्याचे पोलिस उपनिरीक्षक आर. टी. तांदाळकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र बँकेतर्फे पोलिसांचा सत्कार
महाराष्ट्र बँकेच्या वतीने विशेष ग्राहक मेळावा व जनजातीय गुणगौरव दिवस साजरा करण्यात आला. वावी पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत दरोड्यातील संशयितांसह बँकेत ग्राहकांची फसवणूक करणार्‍या भामट्याला ताब्यात घेतल्याने वावी पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक सागर कोते तसेच सरपंच गोपाळ शेळके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे शाखा अधिकारी अनिरुद्ध मैड, उपशाखा अधिकारी सनी पवार, सौरभ चव्हाण, सुमित लोंढे, अशोक भालेराव, विजय म्हैसधुने आदींसह कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : बँकेत ग्राहकास गंडा घालणारा भामटा ताब्यात appeared first on पुढारी.