नाशिक : बाबरी मशिद पतनाच्या निषेधार्थ निवेदन, अजानद्वारे निषेध

बाबरी www.pudhari.news

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा
बाबरी मशिद पतनाच्या निषेधार्थ शहरातील विविध मुस्लिम संघटनांनी मंगळवारी (दि.6) निषेध नोंदविला. निवासी नायब तहसीलदार संदीप धारणकर व अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांना निवेदन देण्यात आले.

इन्सानियत बचाव संघर्ष समितीने बाबरी मशीद पतनाच्या घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी अनिस अझहर, एजाज उमर, रईस उसमानी, अब्दुल करीम, नदीम अहमद, शकील शाह, आमीर मलीक आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. बाबरी मशिद बचाव कमिटीच्या वतीने मो. मुस्तकिम मो. मुस्तफा व सहकार्‍यांंनी बडा कबस्तान येथे दिवंगत साथी निहाल अहमद व बुलंद एकबाल यांच्या कबरीजवळ दुवा पठण केले. लोकसंघर्ष समितीतर्फे माजी नगरसेवक अतिक कमाल, अंजूम अंजान, सलीम सैफ, निहाल अन्सारी, अनिस अहमद उस्मान बाबड, अब्दुल माीद, इम्तियाज, अकील अहमद व कार्यकर्त्यांनी सुलेमानी चौकात सामूहिक अजान देत निषेध नोंदविला. याचबरोबर अदार – ए – इबाहीम, कुल जमाती तंजीम, मुस्लिम लिग, बसपा, ऑल इंडियन सुन्नी जमियतुल इस्लाम या संघटनांनी निवासी नायब तहसीलदार धारणकर व अपर पोलिस अधीक्षक भारती यांना निवेदन दिले.

हेही वाचा:

The post नाशिक : बाबरी मशिद पतनाच्या निषेधार्थ निवेदन, अजानद्वारे निषेध appeared first on पुढारी.