नाशिक : बिझनेस बँकेची आज निवडणूक तर उद्या मतमोजणी

बिझनेस बँक www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
येथील बिझनेस बँकेची पंचवार्षिक निवडणूक रविवारी (दि.30) होत असून, या निवडणुकीत 14 जागांसाठी 15 उमेदवार रिंगणात आहेत.

नाशिकरोड- देवळाली व्यापारी बँकेनंतर सहकार क्षेत्रात दुसरी महत्त्वाची बँक म्हणून बिझनेस बँक ओळखली जाते. या बँकेचे निवडणूक गेल्या वर्षी होणार होती. परंतु, कोरोनामुळे ती होऊ शकली नाही. परंतु, या निवडणुकीचा जून महिन्यात कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. सदरची निवडणूक जुलै महिन्यात होणार होती. परंतु राज्यात अतिवृष्टी झाल्याने निवडणूक स्थगित करण्यात आली होती. सदरची निवडणूक पुन्हा घोषित करण्यात आली व निवडणुकीचे जुलै महिन्यात जी प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर तीच प्रक्रिया कायम ठेवण्यात आली, परिणामी सदरच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या निवडणुकीत एकूण 19 संचालक निवडून येणार असून त्यापैकी पाच जागा या अगोदरच बिनविरोध झाल्या आहेत. त्यामध्ये इतर मागासवर्ग गटातून पुरुषोत्तम फुलसुंदर महिला गटातून आशा जाजू राजश्री कपोते भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून अंजली राठोड व अनुसूचित जाती जमाती या गटातून दयानंद सदाफुले हे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. सदरची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून नाशिक रोड परिसरातील विविध राजकीय पक्षांनी प्रयत्न केले. इतर सर्व उमेदवारांनी सर्वसाधारण गटातून माघार घेतली परंतु जीवन सुभाष घिया यांनी मात्र माघार न घेतल्याने सदरची निवडणूक लादल्या गेली. त्यामुळे आता 14 जागेसाठी सर्वसाधारण गटातून विद्यमान सहकार पॅनलचे 14 व जीवन घिया हे स्वतंत्र असे मिळून एकूण 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामध्ये सहकार पॅनलचे विजय संकलेचा, अशोक तापडिया, वसंतराव नगरकर, निवास लोया, बसंत गुरुनानी, नेमीचंद कोचर, विजय चोरडिया, गोपी आलठ्ठकर, सुरेश टरले, डॉ. पूनमचंद ठोळे, सचिन घोडके, उमेश नगरकर, गोरखनाथ बलकवडे, मोहन लाहोटी आदींचा समावेश आहे.

सोमवारी मतमोजणी….
रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 4 पर्यंत जेलरोड येथील कोठारी कन्या शाळेत मतदान होणार असून, सोमवारी (दि.31) मोटवानी रोड परिसरातील कुलथे मंगल कार्यालयात सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल. 11 पर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : बिझनेस बँकेची आज निवडणूक तर उद्या मतमोजणी appeared first on पुढारी.