नाशिक : बिबट्याचा मेंढ्याचा कळपावर हल्ला

बिबट्याचा हल्ला

कळवण : पुढारी वृत्तसेवा

कळवण तालुक्यातील पाळे खुर्द शिवारातील मेंढ्याच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये बिबटयाने एक मेंढी ठार, एक बछडा फस्त झाला आहे तर अजून एक बछडा घेऊन बिबटया धूम ठोकली आहे.

गेल्या पंधरवड्यापूर्वीच मेंढपाळ वसंत गोरे (रा. विजापूर तालुका, साक्री) हे या परिसरात त्यांच्या मेंढ्या घेऊन आले होते. कळवण तालुक्यातील पाळे खुर्द शिवारातील अभिमन त्र्यंबक पाटील यांच्या शेतामध्ये त्यांच्या मेंढ्यांना आश्रय देण्यात आला होता. मात्र शनिवार (दि.15) रात्री सर्व झोपलेले असताना बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला. यामध्ये एक मेंढी, दोन बछडे फस्त केले. त्यानंतर एक  बछडा घेऊन बिबटयाने धूम ठोकली.  या घटनेमुळे मेंढ्या पालन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी वनविभागाचे अनिल गुंजाळ, पशुवैद्यकीय कर्मचारी अनिल माळेकर यांनी त्वरीत पंचनामा केला. वन विभागाने  येथील परिसरात तातडीने पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : बिबट्याचा मेंढ्याचा कळपावर हल्ला appeared first on पुढारी.