नाशिक : भांडणाच्या कुरापतप्रकरणी अवघ्या काही तासातच युवकाच्या खूनाचा तपास लागला

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

मागील भांडणाची कुरापत काढून एका युवकाची खून झाल्याची घटना शनिवार (दि.१०) रोजी रात्रीच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी व शासकीय रुग्णालयात धाव घेतली. तसेच पंचवटी ठाणेचे गुन्हे शोध पथकाने आरोपीस अवघ्या तीन तासांच्या आत अटक केली आहे.

गुन्ह्यातील मयत रवि महादु शिंदे उर्फ रवि सलिम उर्फ पिंटु सैयद, (२०, रा. गल्ली नं ३, मायको दवाखान्याचे मागे, कालिका नगर, पंचवटी) हा कालिकानगर येथुन घरी पायी जात असताना किरण रमेश कोकाटे याने रिक्षाने मागून येत डावे बाजुने कमरेच्या वरती धारधार शस्त्राने रवि याच्यावर वार केले. या गुन्ह्यातील संशयित फरार झाले. जखमी रवी यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता. डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी व शासकीय रुग्णालयात धाव घेतली. त्याबाबत मयताचे नातेवाईक युसुफ अमीर सैयद, (३३) यांनी आरोपी किरण रमेश कोकाटे याचेविरूध्द दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानुसार या संवेदनशील गुन्हयाच्या अनुषंगाने विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. बि. जी. शेखर पाटिल, पोलीस उपआयुक्त अमोल तांबे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) संजय बारकुंड, सहा. पोलीस आयुक्त गंगाधर सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देवून आरोपीचा शोध घेवुन त्यांना तत्काळ अटक करणेबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या. घटनास्थळी विजय ढमाळ, आंचल मुदगल मध्यवर्ती गुन्हे शाखा यांनी भेट दिली. त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे, युवराज पत्की, रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी विभागातील पंचवटी, म्हसरूळ, आडगाव येथील गुन्हे शोध पथकाच्या वेगवेगळ्या तीन पथक बनवुन आरोपी किरण रमेश कोकाटे याच्या शोधासाठी पथके तयार करून रवाना करण्यात आली. त्याप्रमाणे पंचवटी ठाणेचे गुन्हे शोध पथकाने तांत्रिक व मानवी कौशल्याचा वापर करून आरोपी किरण रमेश कोकाटे यास सिडको, अंबड येथून ताब्यात घेतले. त्यास पोलीस ठाण्यात आणुन त्यांचेकडे गुन्हयाबाबत अधिक तपास केला असता कोकाटे यानेच मयताच्या जुन्या भांडणाचे कारणावरून जिवे ठार मारल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीस या गुन्हयात अटक करण्यात आली असुन गुन्हयाचे पुढील तपासाकरीता न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी रिमांड घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पंचवटी पोलीस ठाणेकडील अधिकारी व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी ही कारवाई पार पाडली. तर  गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक रणजित नलवडे हे करीत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : भांडणाच्या कुरापतप्रकरणी अवघ्या काही तासातच युवकाच्या खूनाचा तपास लागला appeared first on पुढारी.