Site icon

नाशिक : भाजप वाहतूक सेल जिल्हाध्यक्षपदी विजय सानप

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

भारतीय जनता पार्टीच्या नव भारतीय शिव वाहतूक संघटना (भाजप ट्रान्स्पोर्ट सेल) च्या जिल्हाध्यक्षपदी विजय खंडू सानप यांची नियुक्ती करण्यात आली. वाहतूक सेलचे प्रदेशाध्यक्ष हाजी अराफत शेख आणि कार्याध्यक्ष मंगेश सांगळे यांच्या हस्ते सानप यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले.

नाशिक जिल्ह्यातील रिक्षा, टॅक्सी, ट्रक, टेम्पो आणि अवजड वाहने चालविणाऱ्या वाहतूकदारांचे आरटीओविषयक तसेच अन्य जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविणे, त्यांना विमा संरक्षण मिळवून देणे, त्या क्षेत्रातील लोकांना संघटित करणे, सामाजिक बांधिलकीद्वारे वाहतूकदारांच्या कुटुंबीयांचे हित जोपासणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भाजपतर्फे वाहतूक सेलची स्थापना करण्यात आली आहे. विजय सानप यांची या क्षेत्रात असलेली समर्पित भावना आणि वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्यात असलेले नेतृत्वगुण आणि क्षमता लक्षात घेऊन त्यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे हाजी अराफत शेख यांनी सांगितले. विजय सानप हे जिल्हाभरात वाहतूकदारांचे व्यापक जाळे विणतील आणि वाहतूक सेल तसेच भारतीय जनता पक्षाचे संघटन अधिक बळकट करतील, असा विश्वास मंगेश सांगळे यांनी व्यक्त केला. प्रत्येक जिल्हा, तालुका तसेच ग्रामपातळीवर भाजप वाहतूक सेलच्या शाखा उघडण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी पुढे नमूद केले. दरम्यान, श्रेष्ठींनी विश्वास टाकून जी जबाबदारी माझ्यावर टाकली ती निष्ठेने पार पाडीन आणि त्यांचा विश्वास सार्थ ठरवेन, असे विजय सानप यांनी नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक : भाजप वाहतूक सेल जिल्हाध्यक्षपदी विजय सानप appeared first on पुढारी.

Exit mobile version