नाशिक : भुजारिया माता उत्सवानिमित्त मिरवणूक काढून उत्सवाची सांगता

Bhujariya MaTA www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र क्षत्रिय कुशवाह राजपूत समाजाच्या वतीने भुजारिया माता उत्सव साजरा करण्यात आला. भुजारिया मातेच्या आशीर्वादाने धनधान्याची भरभराटी व्हावी, म्हणून हा उत्सव श्रावण महिन्यात साजरा केला जातो. श्रावणात नागपंचमीच्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि रक्षाबंधन, नारळी पौर्णिमेनंतर या उत्सवाची सांगता केली जाते.

स्थापन केलेल्या घटाचे पूजन करून राजपूत परिवारातर्फे न्यू अशोक विहार सोसायटी, दत्त मंदिर रोड येथे भजन, गरबा, आरती करुन वालदेवी नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. यावेळी भूजरिया मातेची मिरवणूक दत्त मंदिर रोड, देवळालीगाव परिसरातून काढण्यात आली. यावेळी विद्या राजपूत, मीरा राजपूत, बसंता राजपूत, मीना राजपूत, कलाबाई राजपूत, मीना शेखर राजपूत, पूनम राजेश राजपूत, सोनाली पंकज राजपूत, छाया जितेंद्र राजपूत, कांचन राजपूत, अनिता राजपूत, मीना राजपूत आदी महिला सहभागी झाला होता. राजपूत पंच कमिटीचे अध्यक्ष हिरालाल राजपूत, गंगाराम राजपूत, रामसिंग राजपूत, वासुदेव राजपूत, रतन राजपूत, रुपेश राजपूत, गौरव राजपूत, युवराज राजपूत, नितीन राजपूत, उमेश राजपूत, पंकज राजपूत, अभिजित धोंगडे आदींनी संयोजन केले.

हेही वाचा:

The post नाशिक : भुजारिया माता उत्सवानिमित्त मिरवणूक काढून उत्सवाची सांगता appeared first on पुढारी.