नाशिक : भुसावळ-इगतपुरी मेमू रेल्वे दोन दिवस रद्द

भुसावळ-इगतपुरी मेमू,www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
रेल्वेच्या भुसावळ विभागातील पाचोरा स्थानकात रिमॉडलिंगच्या कामामुळे 14 आणि 15 ऑगस्टला भुसावळ-इगतपुरी मेमू रेल्वे रद्द करण्यात आली असून, परतीच्या मार्गावर इगतपुरी-भुसावळ मेमू 15 आणि 16 ऑगस्टला रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली.

अमरावती-मुंबई एक्स्प्रेस 14 ऑगस्टला सुरुवातीच्या स्थानकापासून रद्द करण्यात आली आहे. परतीच्या मार्गावर मुंबई-अमरावती गाडी 15 ऑगस्टला मुंबईतून रद्द झाली आहे. नागपूर-मुंबई-सेवाग्राम एक्स्प्रेस 14 ऑगस्टला प्रारंभीच्या स्थानकातून तर परतताना मुंबई-नागपूर सेवाग्राम 15 ऑगस्टला रद्द झाली आहे. मुंबईहून भुसावळला येणार्‍या डाउन रेल्वे गाड्यांमध्ये बेंगळुरू-दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेस एक तास 10 मिनिटे, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर गोदान एक्स्प्रेस एक तास 10 मिनिटे, नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस 20 मिनिटे, लोकमान्य टिळक टर्मिनस-जयनगर पवन एक्स्प्रेस वीस मिनिटे उशिरा धावणार आहे.

भुसावळहून मुंबईला जाणार्‍या अप गाड्यांमध्ये कालका-साईनगर शिर्डी द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस, कामाख्या-एलटीटी वातानुकूलित साप्ताहिक एक्स्प्रेस, सीतापूर-एलटीटी एक्स्प्रेस, बनारस-हुबळी साप्ताहिक एक्स्प्रेस, बनारस-एलटीटी कामायनी एक्स्प्रेस या गाड्या सव्वादोन तास उशिरा धावतील. अमृतसर-मुंबई एक्स्प्रेस आणि गोरखपूर-एलटीटी या गाड्या 50 मिनिटे, जयनगर-एलटीटी पवन एक्स्प्रेस 25 मिनिटे उशिरा धावणार आहे, असे रेल्वे विभागाने कळविले आहे.

हेही वाचा :

 

The post नाशिक : भुसावळ-इगतपुरी मेमू रेल्वे दोन दिवस रद्द appeared first on पुढारी.