नाशिक : भुसावळ-पुणे रेल्वे 1 एप्रिलपर्यंत बंद

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
भुसावळ – पुणे – भुसावळ ही प्रवासी रेल्वेगाडी 28 जानेवारी ते 1 एप्रिल 23 अशी बंद ठेवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने पत्रकाद्वारे दिली आहे. मुंबई विभागातील कर्जत स्थानकाच्या रिमॉडेलिंगच्या कामामुळे ही गाडी स्थगित करण्यात आली आहे. 11026 पुणे – भुसावळ – ही गाडी 28 जानेवारी ते 31 मार्च 23 दरम्यान बंद राहील, तर 11025 भुसावळ – पुणे ही गाडी 29 जानेवारी ते 1 एप्रिल 23 पर्यंत बंद राहील. पुण्याला व्यावसायिक, कौटुंबिक, शैक्षणिक व अन्य कामानिमित्त जाण्यासाठी ही गाडी नाशिक, जळगाव जिल्ह्यांतील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. कोविड काळात ती बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतरही ती अनेकदा रद्द करण्यात आली. आता पुन्हा प्रदीर्घ काळ बंद ठेवण्यात येणार असल्याबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा:

The post नाशिक : भुसावळ-पुणे रेल्वे 1 एप्रिलपर्यंत बंद appeared first on पुढारी.