नाशिक : भूसूरंगाचे ताइत लावून ए टी एम् फोडले

नाशिक (पांगरी): पुढारी वृत्तसेवा
सिन्नर तालुक्यातील पांगरी बुद्रुक येथे चोरट्यांनी ए टी एम् फोडल्याची घटना घडली आहे. गावात सिन्नर- शिर्डी महामार्ग लगत इंडियन ओव्हरसिज बँक असून बँकेच्या एका बाजूला ए टी एम आहे. शनिवार दि.13 पहाटे चार ते साडे चार च्या दरम्यान अज्ञातांनी एटीएम् फोडण्याचा प्रयत्न केला. परंतू एटीएम फोडता आले नसल्याने चोरट्यांनी शेवटचा पर्याय म्हणून थेट एटीएम् मशीनलाच सुरुंगाचा टाइत लावून मशीन फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
एटीएमच्या ठिकाणी स्फोट झाल्यावर आजुबाजूच्या परिसरातील नागरिक गर्दी करायला लागल्याने चोरट्यांनी त्वरीत तेथून पोबारा केला. या स्फोटामुळे शटर आणि आतील काचेचा दरवाजा, सीलिंग तसेच एसीच्या चिंधड्या उडाल्या. तर वावी पोलिसांनी त्याचठिकाणरवरून नुकतेच पेट्रोलिंग वाहनातून तीन वाजून पंधरा मिनिटांनी तेथून पाहणी केली होती. त्यानंतरच ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर शनिवारपासून बँकांना सलग चार दिवस सुट्टी असल्याने एटीएम् भरलेले असावे या हेतूने चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला असावा. बॅंक प्रशासनाकडून या बाबत ची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. वावी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते, पोलिस उपनिरीक्षक विजय सोनवणे, बिट हवालदार सतीश बैरागी यांनी तत्काळ भेट घटनास्थळी भेट देत पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : भूसूरंगाचे ताइत लावून ए टी एम् फोडले appeared first on पुढारी.