नाशिक : मनपाच्या ‘कौशल्य’अंतर्गत सहा हजार महिला प्रशिक्षित

कौशल्य प्रशिक्षण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महिलांना रोजगाराची संधी मिळावी, या उद्देशाने महापालिकेच्या समाजकल्याण विभागातर्फे किमान कौशल्य प्रशिक्षण उपक्रमांतर्गत सहा हजार महिलांना विविध व्यवसाय व रोजगारनिर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

हिरावाडी, पंचवटी भागात किमान कौशल्य प्रशिक्षणांतर्गत इंद्रजित टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या समन्वयाने शगुन ब्यूटीपार्लर प्रशिक्षणवर्गाचे उद्घाटन मनपाचे समाजकल्याण विभागाचे उपआयुक्त डॉ. दिलीप मेनकर यांच्या हस्ते करण्यात आले. 30 युवती आणि महिलांनी प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. एवढेच नव्हे तर पुढील बॅचसाठी लगेच काही युवती आणि महिलांनी प्रवेशासाठी त्या ठिकाणी संपर्क साधला आहे. शगुन ब्यूटीपार्लरच्या कविता देवकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका कार्यक्षेत्रात सुमारे 10 हजार महिलांना किमान कौशल्य कार्यक्रमांंतर्गत विविध व्यवसाय आणि रोजगारनिर्मितीचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचा फायदा जास्तीत जास्त युवती, महिलांनी घ्यावा, असे आवाहन उपआयुक्त डॉ. दिलीप मेनकर यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला मनपाच्या मलेरिया विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र त्र्यंबके, इंद्रजित टेक्निकल इन्स्टिट्यूटचे संचालक कैलाश सोनवणे, किशोर सूर्यवंशी, धनंजय खैरनार, सोमनाथ कासार आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : मनपाच्या ‘कौशल्य’अंतर्गत सहा हजार महिला प्रशिक्षित appeared first on पुढारी.