नाशिक : ‘मनरेगा’तून जिल्ह्यातील दीड लाख नागरिकांना रोजगार

Manrega www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत एक लाख 54 हजार व्यक्तींना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे मार्चअखेर असलेले उद्दिष्ट ऑक्टोबरच्या आतच पूर्ण झाल्याने राज्यात जिल्ह्याचा पाचवा क्रमांक लागला आहे. गेल्या तीन वर्षांत प्रथमच नाशिकने पहिल्या पाचमध्ये स्थान पटकावले आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात कुशल व अकुशल अशा स्वरूपाची कामे केली जातात. या योजनेच्या माध्यमातून गावात विकासाला चालना मिळण्यासोबतच व्यक्तींना रोजगारदेखील मिळतो. यामध्ये मनुष्यबळाच्या आधारे 60 टक्के कामे केली जातात. तर 40 टक्के कामे ही यांत्रिक स्वरूपात केली जातात. प्रत्येक कामाचे निकष ठरलेले असतात. त्याप्रमाणे कामे होत असली तरी जिल्ह्याला निर्धारित केलेला लक्षांक हा 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षासाठी दिला जातो. नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने हे उद्दिष्ट यंदा ऑक्टोबर 2022 मध्येच पूर्ण केल्यामुळे यापुढे अतिरिक्त काम नाशिक जिल्ह्यात होणार आहे. त्यातही शाश्वत विकासाची कामे कशी होतील, याद़ृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत, असे या विभागातर्फे सांगण्यात आले.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘मनरेगा’तून जिल्ह्यातील दीड लाख नागरिकांना रोजगार appeared first on पुढारी.