Site icon

नाशिक : महापालिकेतर्फे गणेशोत्सव स्पर्धा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा, याकरिता नाशिक महापालिकेमार्फत विविध उपाययोजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमध्ये नागरिकांचादेखील सक्रिय सहभाग असावा, असा महापालिकेचा प्रयत्न असून, आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

श्री गणेशोत्सवानिमित्त घरोघरी श्रींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. नाशिक मनपा क्षेत्रातील नागरिकांनी स्पर्धेच्या अनुषंगाने शाडू मातीपासून तयार केलेल्या त्यांच्या घरातील पर्यावरणपूरक मूर्तीची प्रतिष्ठापना, पर्यावरणपूरक गणेशोत्सव आरास व श्री विसर्जन असे छायाचित्र health.nashikcorporation@gmail.com या संकेतस्थळावर अपलोड करावे. स्पर्धेच्या प्रवेशिका 11 सप्टेंबर 2022 पर्यंतच संबंधित संकेतस्थळावर स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर आलेल्या प्रवेशिका विचारात घेतल्या जाणार नाहीत. संबंधित विभागीय अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील घरगुती आरासांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल याकामी गठीत केलेल्या समितीकडे सादर करतील. प्राप्त अहवालांची पडताळणी करून समिती पारितोषिकांबाबत अंतिम निर्णय घेईल. घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्पर्धेचे नियोजन केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन नाशिक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम यांनी केले आहे.

असे असेल पारितोषिकाचे स्वरूप
– प्रथम : 10 हजार रुपये
– द्वितीय : पाच हजार रुपये
– तृतीय : तीन हजार रुपये

हेही वाचा:

The post नाशिक : महापालिकेतर्फे गणेशोत्सव स्पर्धा appeared first on पुढारी.

Exit mobile version