नाशिक : महिला अभ्यासवर्गातून उद्योजकतेचे धडे

उद्योजक www.pudhari.news

नाशिक (कनाशी) : पुढारी वृत्तसेवा

जनजाती कल्याण आश्रमाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागातर्फे मालेगाव विभागात जनजाती महिला अभ्यासवर्ग कनाशी (ता. कळवण) येथे होऊन त्यात महिलांना उद्योजिका होण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अभ्यासवर्गाचे उद्घाटन व दीपप्रज्वलन खेळाडू कविता राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष वैशाली देशपांडे, क्षेत्र कार्यप्रमुख मंगल सोनवणे उपस्थित होते. कांचन कुलकर्णी आणि कोसावन सरपंच मीना गांगुर्डे यांनी प्रास्ताविक केले. महिला अभ्यासवर्गासाठी कळवण, सटाणा, चांदवड, देवळा, येवला, नांदगाव, मालेगाव तालुक्यातून महिला आल्या होत्या. शैलेजा आरानके यांनी सूत्रसंचालन केले. मालेगाव विभागाचे सचिव संदीप भुसे, सहसचिव महेश वानखेडे, वसंत महाले, रायसिंग गांगुर्डे, मालेगाव संघटनमंत्री नीलेश पवार, डॉ. अश्विनी दापोरकर, स्नेहा पाटील यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा:

The post नाशिक : महिला अभ्यासवर्गातून उद्योजकतेचे धडे appeared first on पुढारी.