नाशिक : महिलेकडील दागिने ओरबाडून दुचाकीस्वार चोरटे फरार

chain snaching

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

धात्रक फाटा परिसरात पादचारी महिलेकडील दागिने ओरबाडून दुचाकीस्वार चोरटे फरार झाल्याची घटना सोमवारी (दि.३१) सायंकाळी घडली. छाया वालचंद वाघ (रा. धात्रक फाटा) या सायंकाळी पाचच्या सुमारास परिसरातून पायी जात असताना दुचाकीवरून दोघे चोरटे आले. चोरट्यांनी छाया यांच्याकडील दीड लाख रुपयांचे सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने ओरबाडून पळ काढला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : महिलेकडील दागिने ओरबाडून दुचाकीस्वार चोरटे फरार appeared first on पुढारी.