नाशिक : माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांना भाजपच्या उमेदवारीची च‌र्चा

विशाल संगमनेरे www.pudhari,news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या शिवसेना प्रवेशाची शक्यता धूसर झाली आहे. त्यांना भाजपचीच उमेदवारी मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जाते आहे. नाशिकरोड प्रभाग सभापती पदाच्या निवडणुकीत त्यांनी गैरहजरी लावण्यामुळे भाजपमधून हकालपट्टी होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. नाशिक महापलिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी सध्या तारीख पे तारीख दिली जात आहे. निवडणूक कधी होईल, याविषयी कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. मात्र, कुठल्या प्रभागातून कोण निवडणूक लढविणार याविषयी चर्चा राजकीय पटलावर रंगत आहे.

भाजपचे माजी नगरसेवक विशाल संगमनेरे, माजी नगरसेविका सीमा ताजणे हे प्रभाग निवडणुकीत गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर भाजप कारवाई करेल, अशी शक्यता वर्तवली होती. दोघांनीही ही शक्यता गृहीत धरून शिवसेना प्रवेशाची मार्चेबांधणी केली होती. ताजणे यांना शिवसेनेकडून उमेदवारीदेखील मिळेल, असे बोलले जात आहे. तर संगमनेरे यांचा शिवसेना प्रवेश सोहळा पुढे ढकलला होता. अलीकडेच राज्य व शहरपातळीवर बदललेल्या राजकीय घडामोडींमुळे संगमनेरे हे भाजपमध्येच राहणार असून, त्यांना एका बड्या नेत्याने तसा शब्दही दिला असल्याची चर्चा केली जाते आहे.

राजकीय समीकरणे बदलणार
विशाल संगमनेरे यांचा शिवसेनेतील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात होता. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासोबतचे त्यांचे छायाचित्रे सोशल मीडियात व्हायरल झाले होते. संगमनेरे भाजपमध्येच राहणार असून, त्यांची उमेदवारीदेखील अंतिम मानली जात आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांना भाजपच्या उमेदवारीची च‌र्चा appeared first on पुढारी.