नाशिक : माझी वसुंधरा अभियानांतर्गत निफाडने जिंकला पावणेदोन कोटींचा पुरस्कार

निफाड; पुढारी वृत्तसेवा : नुकत्याच झालेल्या माझी वसुंधरा स्पर्धेत निफाड नगरपंचायतीने राज्यात तिसरा क्रमांक पटकावलेला असून निफाड नगरपंचायतीला तब्बल पावणे दोन कोटी रुपयां ची पुरस्कार राशी मिळाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि.5 जून रोजी वसुंधरा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष मा. नार्वेकर, महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव श्री दराडे यांच्या हस्ते निफाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ. रत्नमाला ताई कापसे, उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अमोल चौधरी, सभापती नगरसेवक साहेबराव बेर्डे , बांधकाम सभापती किशोर ढेपले यांना सन्मानित करण्यात आले.

सदर प्रसंगी नगरपंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा अभियंता भाग्यश्री सोनवणे, असिफ पठाण, देवदत्त कापसे, हर्षवर्धन मोहिते, मनोज कुंभार्डे आदी उपस्थित होते.

The post नाशिक : माझी वसुंधरा अभियानांतर्गत निफाडने जिंकला पावणेदोन कोटींचा पुरस्कार appeared first on पुढारी.