नाशिक : मार्कण्डेय पर्वतावर ‘हेरिटेज वॉक’

मार्कण्डेय पर्वत www.pudhari.news

नाशिक (अभोणा) : पुढारी वृत्तसेवा
येथील उपविभागीय कार्यालय, तहसील तसेच कळवण पंचायत समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी विकास मीना, तहसीलदार बंडू कापसे व गटविकास अधिकारी डॉ. नीलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय कर्मचारी व लोकसहभागाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.

कळवण तालुक्यातील तसेच ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेले मार्कण्डेय पर्वत येथे हेरिटेज वॉक करण्यात आला. यावेळी विविध शासकीय जिल्हा परिषद, महसूल आदींसह रोटरी क्लब व नागरिक अशा एक हजारापेक्षा जास्त नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून भरपावसात मार्कण्डेय डोंगरावर तिरंगा फडकवला. कळवण मानूर येथील प्रशासकीय इमारत ते चणकापूर हुतात्मा स्मारक येथे तिरंगा रॅली काढण्यात आली. यामध्ये कळवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. नीलेश पाटील, अधिकारी व कर्मचारी, ग्रामसेवक, संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मोटारसायकलवर तिरंगा रॅलीत सहभाग घेतला. रॅलीत अभिनव शाळेचे मुख्याध्यापक विकेश बागूल यांच्या देखरेखीत पुष्पवृष्टी करण्यात आली. चणकापूर हुतात्मा स्मारक येथे ग्रामपंचायत चणकापूरचे सरपंच ज्ञानदेव पवार, ग्रामसेवक आर. यू. महाजन व नागरिकांनी रॅलीचे सवाद्य व नृत्याने स्वागत केले. यावेळी तहसीलदार बंडू कापसे, सपोनि नितीन शिंदे यांनीही सहभाग नोंदवला. कळवण पंचायत समितीच्या वतीने नवी बेज येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक, संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक व पंचायत समितीच्या कर्मचारीवर्गाने मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. यासाठी नवी बेज संघाचे शरद निकम व महेंद्र देवरे यांचे विशेष सहकार्य लाभले.

हेही वाचा:

The post नाशिक : मार्कण्डेय पर्वतावर ‘हेरिटेज वॉक’ appeared first on पुढारी.