नाशिक : मुंढेगाव शाळेत विज्ञान केंद्राची उभारणी

मुंढेगाव www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य शासनाच्या प्रेरणेतून इगतपुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंढेगाव येथे नावीन्यपूर्ण असे विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे. में. क्युरिऑन एज्युकेशन प्रा. लि. ठाणे यांनी या केंद्रासाठी एकूण 520 साहित्यांचा पुरवठा केला आहे. वर्गातील शैक्षणिक वातावरण उत्साही मुलांना सतत क्रियाशील ठेवणारे असावे. त्यांना विचार करावयास चालना देणारे, त्यांची संशोधक वृत्ती जोपासणारे, नावीन्याची माहिती मिळवणे व त्याचा वापर करण्यास प्रवृत्त करणारे, कृतीस वाव मिळवून देण्यासाठी विविध संसाधने वर्गात उपलब्ध असायली हवी. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने शाळेत नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्राची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा. त्यांना विज्ञान व गणित विषयाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने या अभियानास प्रारंभ करण्यात आला असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक नरेंद्र सोनवणे यांनी दिली. या नावीन्यपूर्ण केंद्रामुळे संशोधक वृत्तीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळून त्यातून पुढे भावी संशोधक निर्माण होणार आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : मुंढेगाव शाळेत विज्ञान केंद्राची उभारणी appeared first on पुढारी.