नाशिक : मुख्यमंत्री शिंदें यांच्या दसरा मेळाव्यासाठी त्र्यंबकमधून शंभर बसेस जाणार

एकनाथ शिंदे

ञ्यंबकेश्वर: पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे सचिव संजय माशलीकर, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. २९) झालेल्या बैठकीत मुंबईतील दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी तालुक्याच्या ग्रामीण भागातून साडेचार हजार तर त्र्यंबक शहरातून पाचशे असे एकूण पाच हजार शिवसैनिक मुख्यमंत्री शिंदे यांच्या दसरा मेळाव्यास जाणार आहेत. प्रवासासाठी 100 बस भाडेतत्त्वावर घेण्याचे नियोजन केले जात आहे.

प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये तालुकाप्रमुख रवि वारुणसे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. उपजिल्हाप्रमुखपदी मनोहर महाले, विधानसभाप्रमुखपदी गोटीराम कारंडे, उपतालुकाप्रमुखपदी देवराम भस्मे व रघुनाथ गांगुर्डे, युवासेना शहरप्रमुखपदी अंकुश परदेशी, युवासेना शहर संघटकपदी अक्षय भांगरे व मंगेश खोडे अशा नियुक्ता जाहीर करण्यात आल्या. पदनियुक्तीनंतर दसरा मेळाव्याचे नियोजन करण्यात आले. शिवसैनिकांच्या मुंबई प्रवासासाठी 100 एसटी बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असल्याची माहिती ञ्यंबकेश्वर शिंदे गटाचे संयोजक भूषण अडसरे यांनी दिली. यावेळेस व्यासपीठावर माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, ज्येष्ठ नेते सुरेश गंगापुत्र उपस्थित होते.

शहरात राजकीय बदलाचे वारे : येत्या रविवारी प्रस्थापित शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन हा प्रवेश सोहळा होणार आहे. पालिकेच्या राजकारणात विविध पदावर राहिलेले व शहराच्या राजकारणात फेरबदल घडवण्याची क्षमता असलेल्या नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. याचवेळेस ञ्यंबकेश्वर शहरप्रमुखाची जबाबदारी यामधूनच निश्चित करण्यात येणार असल्याचे संयोजक भूषण अडसरे यांनी संकेत दिले आहेत. ञ्यंबक नगर परिषदेची मुदत येत्या 16 डिसेंबरला संपणार आहे. ञ्यंबक शहर भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. तशात शिंदे गट सोबत असेल तर राजकीय इप्सित साधणे शक्य होईल, अशी स्थिती तूर्त आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : मुख्यमंत्री शिंदें यांच्या दसरा मेळाव्यासाठी त्र्यंबकमधून शंभर बसेस जाणार appeared first on पुढारी.