नाशिक : मुस्लीम पोटजातीतील जोडप्यांचा सामूहिक विवाहसोहळा

सामुदायिक विवाह www.pudhari.news

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
येथील खानकाह चिश्तीया इल्यासिया यांच्या माध्यमातून व बारा बलुतेदार मित्रमंडळाच्या विशेष सहकार्याने सामुदायिक विवाहसोहळा पार पडला. त्यात पाच मुस्लीम जोडप्यांचा निकाह पढविण्यात आला. त्यासाठी सुफी सय्यद मोहम्मद इलियास चिश्ती, सुफी मोहम्मद रमजान चिश्ती, सुफी मोहम्मद रमजान चिश्ती यांसह बारा बलुतेदार मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बंडूकाका बच्छाव यांनी परिश्रम घेतले.

शहरातील गांधीनगर चौकातील खालीदा युनूस हॉलमध्ये हा सोहळा उत्साहात पार पडला. शेख, खान, अन्सारी, मेमन, पठाण अशा पाच वेगवेगळ्या पोटजातीतील युवकांचा एकाच मंचावर निकाल झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. या पाचही जोडप्यांना कपडे, पलंग, कपाट, गॅस-शेगडी, भांडे आदी संसारोपयोगी साहित्य भेट स्वरूपात देण्यात आले. या सोहळ्याच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी, सेवाभाव, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. अशा विधायक कार्यक्रमांतून समाजात सलोख्याची, एकोप्याच्या भावना जोपासली जाते, अशी प्रतिक्रिया बच्छाव यांनी नोंदवली. याप्रसंगी युसूफ मिर्झा, शेख अब्बास हाजी, सुलेमान अमजद, शरीफ मेमन आदींसह शेकडो मुस्लीम बांधव उपस्थित होते. बारा बलुतेदार मंडळाने कोरोना काळात राम – रहिम कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून अनेक रुग्णांना स्वस्तात वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देत त्यांची हेळसांड थांबविली होती. शिवाय, गरिबांना अन्नधान्य वाटपही केले होते.

हेही वाचा:

The post नाशिक : मुस्लीम पोटजातीतील जोडप्यांचा सामूहिक विवाहसोहळा appeared first on पुढारी.