नाशिक : मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी आता मोजावे लागणार ‘शुल्क’

मृत जनावरांची विल्हेवाट,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहरात मृत होणाऱ्या जनावरांचे प्रेत हलविणे तसेच त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आता महापालिका संबंधितांकडून शुल्क आकारणार असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेवर सादर करण्यात आला आहे. सुमारे एक हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारणी केली जाईल.

स्थानिक स्वराज्य संस्था नियमांमध्ये महापालिकांसाठी १८ प्रकारच्या स्वच्छताविषयक तरतुदी आहेत. त्यात जनावरांच्या प्रेताची विल्हेवाट लावणे किंवा जनावरांचे प्रेत हलविणे हे महापालिकेच्या कर्तव्यात समाविष्ट आहे. मनपा पशुसंवर्धन विभागामार्फत ही कामे केली जातात. मात्र, सद्यस्थितीत शहरातील कोणत्याही व्यक्तीकडून शुल्क आकारले जात नाही. मोकाट व भटके जनावर मृत असल्यास किंवा मृत जनावरे उचलण्याकरता जनावरांच्या मालकांकडून शुल्क घेणे आवश्यक असून, मनपाच्या खत प्रकल्पातील दाहिनीमध्ये जनावरांच्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते. महापालिकेच्या सहाही विभागांत मोकाट, भटके तसेच पाळीव प्राणी गोठ्यातील मृत जनावरे उचलणे व विल्हेवाट लावण्यासंदर्भात पशुसंवर्धन विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्याने त्याअनुषंगाने शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका हद्दीतील रस्त्यावरील मोकाट किंवा भटकी जनावरे जसे की कुत्रा, मांजर, शेळी, बोकड, गाय, बैल, म्हैस, रेडा, गाढव यांसारखे मृत जनावरे आढळून आल्यास त्यावर शुल्क आकारले जाणार नसल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.

एक हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारणी

कुत्रा, मांजर, बोकड, शेळी, वासरू यांसारखी लहान जनावरांसाठी प्रतिजनावर तीनशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे. गाय, म्हैस, गोऱ्हा, बैल, रेडा, घोडा, गाढव व इतर मोठ्या जनावरांसाठी एक हजार रुपये प्रतिजनावर असे शुल्क आकारले जाणार

हेही वाचा :

The post नाशिक : मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी आता मोजावे लागणार 'शुल्क' appeared first on पुढारी.