नाशिक : मोगरे खून प्रकरणातील मुख्य संशयित ताब्यात, हरियाणात सापळा रचत जेरबंद

अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कार चोरण्याच्या प्रयत्नात कारमालक योगेश मोगरे यांचा खून करणाऱ्या मुख्य संशयितास हरियाणा येथून गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट दाेनने गत आठवड्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलास हरियाणातून ताब्यात घेतले हाेते.

अजितसिंग सत्यवान लठवाल (२५, रा. हरियाणा) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. अजितसिंग यास त्याच्या गावी सापळा रचून ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यास घेऊन पथक नाशिकच्या दिशेने रवाना झाले असून, ते मंगळवारी (दि. ४) नाशिकला पाेहाेचणार आहे. अंबड एमआयडीसीतील रोहिणी इंडस्ट्रिजचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश सुरेश मोगरे (३९, रा. इंदिरानगर) यांच्यावर २३ मार्चला रात्री आग्रा राेडवरील हॉटेल अंगणबाहेर प्राणघातक हल्ला झाला हाेता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मारेकऱ्यांनी मोगरे यांची कार चोरून नेली होती. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यातील दोनही संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

The post नाशिक : मोगरे खून प्रकरणातील मुख्य संशयित ताब्यात, हरियाणात सापळा रचत जेरबंद appeared first on पुढारी.