नाशिक : म्हसरूळला 11 जोडप्यांच्या सहजीवनाचा सुवर्ण महोत्सव

लग्न www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

म्हसरूळ येथील एकता ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त मंडळातील ज्या सभासदांच्या विवाहास 50 वर्षे पूर्ण झाली, अशा 11 जोडप्यांचा पुनर्विवाह लावण्यात आला.

या सोहळ्यामध्ये मंडळाचे अहिल्याबाई प्रतापराव वाढणे यांच्यासह धाडगे, चंदणे, बनकर, सूर्यवंशी, खांडेकर, अहिरे, कुलकर्णी, परमार, चव्हाण व गवारे या जोडप्यांच्या विवाह लावण्यात आला. या सोहळ्यास प्रत्येकाच्या कुटुंबातील मुले, मुली, सुना, जावई, नातू उपस्थित होते. प्रत्येकाच्या नातेवाइकांनी 50 वर्षे पूर्ण केलेल्या आपल्या आई-वडिलांना, आजी-आजोबांना मुंडावळ्या बांधल्या. काही जण विवाह सोहळ्याच्या वेळी त्यांच्या पाठीमागे उभे राहिले होते. काही जणांनी अंतरपाट धरला, बाबरेकर, उपकारे यांनी मंगलाष्टके म्हटली. यावेळी प्रत्येकाने उखाणा घेतला. या सर्वांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. तसेच दाम्पत्यास गोंदवलेकर महाराजांचे प्रवचनांचे पुस्तक व सन्मान पत्र देण्यात आले. प्रमुख पाहूणे म्हणून लोकज्योती मंचाचे उपाध्यक्ष सूर्यवंशी, पत्रकार नरेंद्र जोशी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुधाकर भोईसर, अनिल विभांडिक, एकनाथ पगार, प्रतापराव वाढणे, राजेंद्र वाघमारे, वैशाली मुठे, नंदिनी पगार आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : म्हसरूळला 11 जोडप्यांच्या सहजीवनाचा सुवर्ण महोत्सव appeared first on पुढारी.