Site icon

नाशिक : यूएईतील गुंतवणूक संधीचा उद्योजकांनी लाभ घ्यावा : आयमाचे अध्यक्ष पांचाळ यांचे आवाहन

सिडको : पुढारी वृत्तसेवा; यूएईत भारतीय उद्योजकांसाठी असलेल्या गुंतवणुकीच्या संधींचा नाशकातील उद्योजक आणि उदयोन्मुख निर्यातदारांनी लाभ घ्यावा आणि आपली उन्नती साधावी, असे आवाहन आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ यांनी केले.

भारतीय उद्योजकांसाठी यूएईत गुंतवणुकीच्या कोणत्या संधी आहेत याची माहिती देण्यास तेथील सरकारी अधिकारी चार्ल्स डॅनियल, गोमोन जॉर्ज, जितीन अमीन यांनी नाशिक दौऱ्यात अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (आयमा) कार्यालयास भेट दिल्यानंतर आयमाचे पदाधिकारी आणि उद्योजकांबरोबर त्यांची संवाद बैठक झाली. त्यावेळी पांचाळ बोलत होते. यावेळी आयमाचे सरचिटणीस ललित बूब, बीओटी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, वरुण तलवार, हर्षद बेळे तसेच गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम ग्लोबलचे अध्यक्ष डॉ. सुनील मांजरेकर उपस्थित होते.

यूएईमध्ये मॅन्युफॅक्चरिंग,ऑइल अँड गॅस, फूड इंडस्ट्री, मॅरिटाईम इंडस्ट्री आदी क्षेत्रांत भारतीय उद्योजकांना गुंतवणुकीच्या व आपल्या उद्योगाचा विस्तार करण्यास चांगला स्कोप असून, तेथे त्याबाबत कोणत्या सुविधा आणि सवलती यूएई सरकारतर्फे दिली जाते याची माहिती यूएईच्या अधिकाऱ्यांनी दिली. गल्फ महाराष्ट्र बिझिनेस फोरम ग्लोबलचे अध्यक्ष डॉ. सुनील मांजरेकर यांनी गल्फ राष्ट्रे तसेच आफ्रिकेतील अंगोला, काँगो आणि नायजेरियातील गुणवणुकीच्या संधीबाबत 30 मिनिटांचे सादरीकरण करून उद्योजकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.

हेही वाचा :

The post नाशिक : यूएईतील गुंतवणूक संधीचा उद्योजकांनी लाभ घ्यावा : आयमाचे अध्यक्ष पांचाळ यांचे आवाहन appeared first on पुढारी.

Exit mobile version