नाशिक : राजपूत – सोयगाव रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू

अपघात

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा

येवला तालुक्यातील राजापूर – सोयगाव रस्त्यावर सौर ऊर्जा प्रकल्पाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

राजापूर येथील सौर ऊर्जा प्रकल्पाजवळ लोहशिंगवे येथून संदीप भागवत घुगे व संकेत विष्णू सानप हे दोघे राजापूर येथे डिझेल आणण्यासाठी येत होते. राजापूरकडून लोहशिंगवे येथे दिनकर तानाजी हिंबाडे हे जात असताना, या दोघांच्या दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये दोन्ही दुचाकींवरील एक जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना येवला येथे आणले. मात्र, वैदयकीय अधिकारी यांनी दिनकर तानाजी हेंबाडे यांना मृत घोषित केले. संदीप घुगे व संकेत सानप यांच्यावर उपचार सुरू आहेत. येवला तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस हवालदार डी. के. ठोंबरे अधिक तपास करत आहेत. राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कुंटे यांना अपघाताबाबत कळविले असता घटनास्थळी रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नसल्याने ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : राजपूत - सोयगाव रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.