नाशिक : राजापूर सरपंचपदी वंदना आगवन बिनविरोध

राजापूर www.pudhari.news
नाशिक (राजापूर/येवला) : पुढारी वृत्तसेवा
येवला तालुक्यातील राजापूर सोमठाणजोश ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी वंदना शरद आगवन यांची ठरलेल्या रोटेशनप्रमाणे निवड झाली असून ही निवड बिनविरोध झाली आहे.‌ सरपंच वंदना दत्तात्रय सानप यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेसाठी वंदना शरद आगवन यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
येवला तालुक्यातील राजापूर सोमठाणजोश ही ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत असून सोमठाणजोश गावाला जनरल जागेतून गेल्या काही वर्षानंतर सरपंचपदाची संधी मिळाली असल्याने जनरल जाग्यातून वंदना शरद आगवन यांची निवड झाली आहे निवडणूक निर्णय अधिकारी मंडल अधिकारी कोळी यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामविकास अधिकारी आर. एस. मंडलिक यांनी सहकार्य केले. मावळत्या सरपंच वंदना सानप यांनी नवनिर्वाचित सरपंच वंदना आगवन यांचा सत्कार केला. यावेळी उपसरपंच प्रकाश वाघ, माजी सरपंच नलिनी मुंढे,  सदस्य ज्ञानेश्वर दराडे, सुभाष वाघ, लता जाधव, अलका सोनवणे, विजय ठाकरे, नामदेव पवार आदी सदस्य उपस्थित होते.  यावेळी  परसराम दराडे,  दिनेश आव्हाड, एकनाथ वाघ, रमेश वाघ, रामभाऊ केदार, दत्ता सानप,  बाळासाहेब दाणे, पि. के. आव्हाड भाऊसाहेब बैरागी, दादाभाऊ विंचू, ज्ञानदेव  भोरकडे, शरद वाघ, कारभारी आगवन, रूपचद तांबे, निवृत्ती पठाडे, भाऊसाहेब आगवण,  काशिनाथ पवार, सुरेश आगवन, गुलाब चवडगिर, कमलाकर डावरे, हरिचंद्र ठाकरे, युवराज राठोड, नवनाथ राठोड, अण्णासाहेब मुंडे, सचिन जाधव, सुनिल मुंढे व राजापूर सोमठाणजोश येथील ग्रामस्थ उपस्थित होते. आगवण कुटुंबात ब-याच वर्षानंतर सरपंच पदाचा मान हा मिळाला असल्याने सोमठाणजोश येथे आनंदउत्सव साजरा करण्यात आला.

हेही वाचा:

The post नाशिक : राजापूर सरपंचपदी वंदना आगवन बिनविरोध appeared first on पुढारी.