नाशिक : रामकुंडावर विनायक मेटेंच्या अस्थि कलशाचे विसर्जन

अस्थी विसर्जन विनायक मेटे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष व माजी आमदार विनायक मेटे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. 22 ऑगस्टला मेटे यांचा अस्थी कलश नाशिकमध्ये आणण्यात आला होता. मात्र,  मेटे यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या अस्थि कलशाची यात्रा दर्शनासाठी विविध जिल्ह्यात नेण्यात आली होती. अनेक गावांत ही कलश यात्रा अस्थी दर्शनासाठी गेली. त्यामुळे अस्थि कलशाचे विसर्जन अद्याप झाले नव्हते. ते आज नाशिकच्या रामकुंडावर करण्यात आले.

(छायाचित्रे-हेमंत घोरपडे)

मराठा आरक्षण बैठकीसाठी मुंबईच्या दिशेने जात असताना मुंबई पुणे मार्गावर मेटे यांचे अपघाती निधन झाले. ते 52 वर्षाचे होते. नाशिकच्या रामकुंडावर अस्थि विसर्जन करण्याची परंपरा आहे. आज विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांच्या हस्ते कलश पूजा करण्यात आली. डॉ. ज्योती मेटे या नाशिकमध्ये महसूल विभागात सहनिबंधक म्हणून कार्यरत आहेत. अस्थींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी शिवसंग्रामचे रामहरी मेटे, बहिण सत्वशीला जाधव, भाचे बबन जाधव, मेहुणे नितीन लाटकर व कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. रामकुंडावर अस्थींच्या अंतिम दर्शनासाठी यावेळी अनेक कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : रामकुंडावर विनायक मेटेंच्या अस्थि कलशाचे विसर्जन appeared first on पुढारी.