नाशिक: रोजच शाळेसाठी पाण्यातून जावे लागत असल्याने डुबेरे येथे विद्यार्थ्यांचा रास्ता रोको

डुबेरे www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली डुबेरे येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली पाणी साचत असल्याने गैरसोय होत असल्याची तक्रार करूनही समस्यांचे निरसन होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या समस्या त्वरीत सोडवण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी मान्य झाल्याशिवाय एकही वाहन पुढे जाऊ न देण्याची भूमिका संतप्त विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

समृद्धी महामार्गाचे ठेकेदार, कंपनीचे अधिकारी अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कोणीही घटनास्थळी येऊन विद्यार्थ्यांच्या समस्यांवर ठोस कारवाई करत नसल्याने विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली असता त्यांनी समृद्धी महामार्गाच्या ठेकेदारावर जबाबदारी असल्याचे सांगून हात झटकले आहेत. तर पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी आंदोलन स्थळी पोहोचले असून विद्यार्थ्यांची आंदोलन मागे घेण्यासाठी समजूत काढून विनवणी केली जात आहे.

हेही वाचा:

The post नाशिक: रोजच शाळेसाठी पाण्यातून जावे लागत असल्याने डुबेरे येथे विद्यार्थ्यांचा रास्ता रोको appeared first on पुढारी.