नाशिक : लहवितकरांनी सोडला नि:श्वास; पाच वर्षांची बिबट्या मादी जेरबंद

नाशिक ( देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा

लहवित गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून संचार करणारी पाच वर्षांची बिबट्या मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

गेल्या काही दिवसांपासून लहवित वंजारवाडी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातल्याने शेतकरी नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहाणी करून राजाराम पाळदे यांच्या शेतात पिंजरा लावला होता. रविवारी पहाटे बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू आल्यानंतर पाळदे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. वनपाल अनिल अहिरराव, विजयसिंह पाटील आदींनी घटनास्थळी तत्काळ येत बिबट्याला गंगापुर येथील रोपवाटिकेत नेले. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.

हेही वाचा :

The post नाशिक : लहवितकरांनी सोडला नि:श्वास; पाच वर्षांची बिबट्या मादी जेरबंद appeared first on पुढारी.