नाशिक : वंजारवाडी येथील गवारी कुटुंबाच्या वारसांना एक लाखाची मदत

गवारी कुटुंब www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

वंजारवाडी येथे वीज पडून मृत्यू झालेल्या गवारी कुटुंबाच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाखाची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे व योगेश म्हस्के यांच्या हस्ते देण्यात आली.

चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने नाशिकसह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्याला पावसाने झोडपून काढले होते. दि.९ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास वंजारवाडी गावात कोळीवाडा परिसरातील एका घराची भिंत कोसळून घरात राहणारे छबू सीताराम गवारी व त्यांची पत्नी मंदा छबू गवारी यांचा मृत्यू झाला होता. ही दुर्दैवी घटना समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे ओएसडी मंगेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष योगेश म्हस्के यांनी तातडीने वंजारवाडी गावात भेट देत सर्वज्ञ श्री सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून पीडित कुटुंबातील अनाथ मुलांना घर बांधण्यासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. यावेळी सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, उपसरपंच बाळू लोहरे, ग्रामसेवक योगेश पगार, दिगंबर नाडे, प्रथमेश पाटील, जितेंद्र सातव,अविनाश काताडे, चेतन गायकवाड, ज्ञानेश्वर शिंदे आदींसह वंजारवाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : वंजारवाडी येथील गवारी कुटुंबाच्या वारसांना एक लाखाची मदत appeared first on पुढारी.