नाशिक : वणी ग्रामपंचायत सरपंचपदी मधुकर भरसट

wani www.pudhari.news
नाशिक (वणी): पुढारी वृत्तसेवा
वणी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालास सोमवारी, दि.१९संप्टेबंर रोजी सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीस सुरवात झाली. या निवडणुकीत भगवती पॅनलचे ९, जगदंबा पॅनलचे ५, परिवर्तन पॅनलचे ३ याप्रमाणे निवडून आले. तर दिंडोरी तालुक्यातील मोठी कसबे वणी येथून मतमोजणीस सुरवात करण्यात आली. वणी ग्रामपंचायतसाठी सहा प्रभाग आहेत. यामध्ये सरपंचाचे उमेदवार माजी सरपंच मधुकर भरसट हे ४३५५ मते मिळवून विजयी झाले आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी नंदु वड यांना ३८८३ मते मिळाले. मधुकर भरसट यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत घसघशीत विजय प्राप्त केला आहे. भगवती पॅनलचे मधुकर भरसट हे सरपंचपदी निवडुन आले. विजयानंतर निवडुन आलेल्या उमेदवारांनी जल्लोष करत गावातील प्रमुख मार्गावरुन मिरवणूक काढली. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला. तसेच प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल आभार मानन्यात आले.
प्रभागानुसार निवडून आलेले उमेदवार असे … प्रभाग क्रमांक १ मध्ये राहुल भास्कर गांगुर्डे यांना ७८२, नामदेव गवळी ८७४, कविता राऊत ८९७, प्रभाग २ विलास कड व विमल बागुल हे बिनविरोध निवडुन आले आहे. प्रभाग ३ मध्ये राकेश थोरात, सुनिल कोरडे व कुसुम नेरकर हे बिनविरोध निवडुन आले. प्रभाग ४ मध्ये अगदी अटीतटीची लढत झाली. यामध्ये राजश्री पारख ७२०, विजय बर्डे ७६०, रंजना पालवी ७६७, प्रभाग ५ मध्ये सदफ जमीर शेख ९१७, जगन वाघ १०२९, स्वाती चोथवे १०८६, प्रभाग ६ मध्ये सुनिल गांगुर्डे ६८०, आनिता बागुल ६३२, उज्वला धुम ७०६ मतांनी विजय झाला.

हेही वाचा:

The post नाशिक : वणी ग्रामपंचायत सरपंचपदी मधुकर भरसट appeared first on पुढारी.