नाशिक : वणी पिंपळगाव मार्गावरील अपघातात भाऊ बहिण ठार तर तीन जखमी

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा 

वणी पिंपळगाव रोडवर गुरुवारी (दि.6) रोजी रात्री एक वाजता पिकपअ व दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दोन चिमुरडे ठार तर तीन जखमी झाल्याची घटना घडली आहे.

वणी पिंपळगाव रोडवर पिकअप (क्रमांक एम एच १६ डिके ७७३७) ही पिंपळगाव कडून वणीकडे येत असताना मार्गाच्या कडेला उभे असलेले फॅशन प्रो मोटरसायकलला (क्रमांक एम एच १५ एच डी ३०३४) धडकली. या अपघातात मोटरसायकलवरील व रस्त्यावरील बाजूला उभे असलेले व्यक्ती जखमी झाल्या. तर दोघे चिमुरड्यांचा जागीच मृत्यू झाला. साहिल सुनील शिरसाठ (१५) व स्नेहल सुनील शिरसाठ (१२) हे दोघे सख्खे भाऊ बहीण ठार झाले. जखमी सुनील बापू शिरसाठ (४०) हे त्यांचे वडील व सोनाली सुनील शिरसाठ (३५) ही मुलांची आई असून ते ओझर येथील रहिवासी आहेत. जखमींमध्ये रमनाबाई अप्पा खवळे (५०) यांचा समावेश असून त्यांना उपचारासाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. तर मयत व्यक्तींवर वणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पिकपअचालक गोकुळ रामहरी शेळके (३०, रा. बोराळे तालुका चांदवड) यास वणी पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : वणी पिंपळगाव मार्गावरील अपघातात भाऊ बहिण ठार तर तीन जखमी appeared first on पुढारी.