नाशिक : वणी सापुतारा महामार्गावर अपघातात एक ठार

वणी अपघात,www.pudhari.news

नाशिक(वणी) : पुढारी वृत्तसेवा 

वणी सापुतारा महामार्गावर मॅक्स जीप व दुचाकी समोरासमोर धडकल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रात्री आठ वाजेच्या दरम्यान सुलक्ष्मी पेट्रोलपंपासमोर महामार्गावर हा अपघात झाला.

वणी सापुतारा महामार्गावर (दि. 31) सुलक्ष्मी पेट्रोल पंप समोर, महेंद्रा मॅक्स जीप ही वणीच्या दिशेने येत होती. दुचाकी वरून कृष्णा नामदेव गांगोडे रा. भोकरपाडा ता. दिंडोरी वणीकडून जात होता. समोरुन येणा-या महिंद्रा मॅक्स (क्र.एम एच १५ ऐ एस ५३४७) या जीप व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यामध्ये जोराची धडक लागल्याने कृष्णा गांगोडे ठार झाला.

दुचाकी जीपखाली अडकल्याने दुचाकीचा चक्काचूर झाला. वणी पोलीसांना अपघाताची माहिती कळताच घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून वणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. लोकांनी तातडीने रुग्णवाहिकेतून वणी ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करीत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : वणी सापुतारा महामार्गावर अपघातात एक ठार appeared first on पुढारी.