नाशिक : वयाच्या 14 व्या वर्षी तिने मिळवली कोलंबिया, घाना विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
‘यंगेस्ट योगशिक्षक’ पुरस्काराने सन्मानित गीत पराग पटणी या चिमुकलीने नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी तिने कोलंबिया आणि घाना या अत्यंत प्रतिष्ठेच्या विद्यापीठाकडून डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केली आहे.

इतक्या कमी वयात एकाच वेळी दोन आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची डॉक्टरेट मिळविणारी गीत ही देशात पहिलीच मुलगी ठरली आहे, अशी माहिती गीत योगा फिटनेस अकादमीच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. काजल पटणी व डॉ. पराग पटणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोरोना काळात लहानग्यांना मोबाइलसह वेगवेगळ्या गॅझेटच्या सवयी जडल्या असून, त्याचे परिणाम आता मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. यावरच गीतने ‘कोरोना काळात लहान मुलांकडून मोबाइलसह इतर गॅझेटचा वापर आणि त्याचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम व योगाभ्यासातून त्यावर उपाय’ या विषयावर प्रबंध लिहिला होता. पुढे हा प्रबंध तिने जगभरातील सात नामांकित विद्यापीठांना सादर केला होता. त्यातील कोलंबिया आणि घाना या विद्यापीठांनी तो स्वीकारला असून, त्याकरिता गीतला डॉक्टरेट ही मानाची पदवी प्रदान केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : वयाच्या 14 व्या वर्षी तिने मिळवली कोलंबिया, घाना विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी appeared first on पुढारी.