नाशिक : वालदेवी धरणावर आता गणेशमूर्ती विसर्जन करता येणार नाही

waldevi www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

धरणाचे पाणी दुषित होऊ नये व गणेश विसर्जन दिवशी दुर्घटना घडू नये, यासाठी पिंपळद येथील वालदेवी धरणावर श्री गणेश मूर्ती विसर्जनास बंदी घालण्याचा निर्णय ग्रामसभेत झाला असल्याची माहिती पिंपळदचे पोलिसपाटील सोमनाथ बेझेकर यांनी दिली.

गणपती विसर्जन दिवशी सिडको, अंबड, पाथर्डी या भागातील गणेशभक्त मूर्ती विसर्जन साठी पिंपळद येथील वालदेवी धरणावर येतात. यात धरणातील पाण्याचा खोलीचा अंदाज येत नसल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे प्रकार घडले आहेत. तसेच धरणातील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जातो. विसर्जनवेळी पाणी दुषित होते. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी व शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे, या उद्देशाने ग्रामसभेत मूर्ती विसर्जनास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामसभेचा ठराव प्रत जिल्हाधिकारी, तहसीलदार, ग्रामिण जिल्हा पोलिस अधीक्षक वाडिवर्हे पोलिस ठाणे येथे देण्यात आली आहे. यावेळी पिंपळदचे पोलिसपाटील सोमनाथ बेझेकर, सरपंच भाऊसाहेब झोबांड, उपसरपंच विलास कड, ग्रामसेवक पाडवी, सदस्य संजय अनार्थ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : वालदेवी धरणावर आता गणेशमूर्ती विसर्जन करता येणार नाही appeared first on पुढारी.