नाशिक : वासरासह दोन पिल्ले बिबट्याने केले फस्त

बिबट्या www.pudhari.news
नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील जाधव वस्तीवर बिबट्याने धुमाकूळ घातला असून बिबट्याने एक वासरु तसेच दोन पिल्ले फस्त केल्याची घटना घडली आहे.
बिबट्याने सोमवारी (दि.14) सकाळी ११ च्य्या सुमारास कैलास जाधव यांच्या शेतात बांधलेली व गवत चरत असलेली वासरु ओढले. यावेळी शेतातच सुनील जाधव हे ट्रॅक्टर चालवत होते. बिबट्याचे दर्शन होताच इतर जनावरांनी  मोठ्याने हंबरडा फोडल्यानंतर शेतकऱ्यांनी बिबट्याला पाहिले. त्यानंतर तातडीने कैलास जाधव, श्रीराम जाधव, खंडू चारोस्कर आदी शेतकरी शेताकडे धावले. ग्रामस्थांना येताना बघताच बिबट्याने ओढत नेत असलेली वासरु शेतातच टाकून धूम ठोकली.  संध्याकाळी सहा वाजता बिबट्या पुन्हा याठिकाणी आला व त्याने परत एकदा वासरु ओढत ऊसात नेले तसेच दोन पिल्लेही फस्त केली. याबाबत दिंडोरी तहसीलदार, वनविभाग, दिंडोरी पोलिस ठाणे यांना नगरसेवक नितीन गांगुर्डे, कैलास जाधव यांनी माहिती दिली. त्यानंतर त्वरीत दुपारी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. दरम्यान, बिबट्या भर दुपारीही शिकार करत असल्याने शेतकरी वर्गात घबराहट निर्माण झाली आहे. वनविभागाने जाधव वस्ती परिसरात पिंजरा बसवण्याची मागणी नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : वासरासह दोन पिल्ले बिबट्याने केले फस्त appeared first on पुढारी.