नाशिक : वाहून गेलेल्या पर्यटकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला; दुगारवाडीतील बचावकार्यात २१ जणांची सुटका

dugarwadi www.pudhari.news

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा

येथून जवळच्या दुगारवाडी धबधबा येथे रविवारी सायंकाळी वाहून गेलेला अविनाश गरड या पर्यटकाचा मृतदेह सोमवारी (दि. ८) दुपारी २ च्या सुमारास त्याचा मृतदेह आंबई शिवारात नदीपात्रात सापडला. रात्री धबधब्यावर अडकून पडलेल्या २१ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात बचाव पथकाला यश आले.

रविवारी (दि. 7) दुपारच्या वेळी नाशिक परिसरातील 22 पर्यटक दुगारवाडी धबधब्यावर फिरण्यास गेले होते. त्यांनी सर्वांनी धबधब्याच्या तळाजवळ जाण्यासाठी टेकडी उतरून नदी ओलांडली आणि धबधबा परिसरात पोहोचले. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आणि नदीला पूर आला. नदी ओलांडता येत नसल्याने रात्री उशिरापर्यंत 17 पर्यटक अडकल्याचे वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना समजले. त्यावर तातडीने प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे, मंडलाधिकारी हेमंत कुलकर्णी, तलाठी डोंगरे यांच्यासह महसूल अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार, वनपाल गोऱ्हे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. नाशिक येथून गिर्यारोहकांची कुमक मदतीला धावली. त्र्यंबकचे पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे हेही बचावकार्यात सहभागी झाले होते. भरपावसात आणि अंधारात जंगलात अडकून पडलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर काढेपर्यंत रात्रीचे 2 वाजले होते. दरम्यान अविनाश गरड हा पर्यटक वाहून गेल्याचे समजले. मात्र, रात्रीच्या अंधारात शोध घेणे अशक्य ठरले. सोमवारी दुपारी त्याचा मृतदेह आंबई शिवारातील नदीपात्रात सापडला.

हेही वाचा:

The post नाशिक : वाहून गेलेल्या पर्यटकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला; दुगारवाडीतील बचावकार्यात २१ जणांची सुटका appeared first on पुढारी.