नाशिक : विद्यार्थ्यांनी साकारले इकोफ्रेंडली बाप्पा

गणेश मूर्ती कार्यशाळा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
के. के. वाघ शिक्षण संस्था आणि स्मार्ट मॅनेजमेंट इंटरफेस लोकल एक्स्चेंज (स्माइल) व स्पिनॅच सेंटर ऑफ एक्सलन्स यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवारी (दि. 21) ‘इकोफ्रेंडली गणेशा’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील विविध शाळांच्या साडेतीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावत पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणपती बाप्पाची मूर्ती साकारली. कार्यशाळेस उदंड प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी शाडू मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प केला.

उद्घाटनाप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार डॉ. राहुल रनाळकर, संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, विश्वस्त शकुंतला वाघ, स्माइल व स्पिनॅचचे सचिव अजिंक्य वाघ, संस्थेचे सचिव प्रा. के. एस. बंदी, प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर, तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. पी. टी. कडवे आदी मान्यवर उपस्थित होते. दिवसेंदिवस पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्तींची स्थापना करण्याचा संकल्प कौतुकास्पद असल्याचे स्माइल व स्पिनॅचचे सचिव वाघ यांनी सांगितले. प्राचार्य कडवे यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेत के. के. वाघ ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन जाधव, अधिष्ठाता बाळकृष्ण नगरकर, भूषण कोंबडे आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुनील क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी डॉ. नानासाहेब गुरुळे, प्रसाद जगताप, जयेश डेर्ले आदींनी परिश्रम घेतले.

हेही वाचा:

The post नाशिक : विद्यार्थ्यांनी साकारले इकोफ्रेंडली बाप्पा appeared first on पुढारी.