नाशिक विभागात ६० टक्के गोवर लसीकरण; आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर

गोवर लसीकरण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यात गोवरमुळे काही बालकांना जीव गमवावे लागले असून अनेकांना बाधा झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेमार्फत लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यानुसार चालू वर्षी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यात ६०.५२ टक्के लसीकरण करण्यात आले आहेत. सर्वाधिक ६२.८५ टक्के लसीकरण जळगाव जिल्ह्यात झाले आहेत.

गोवर मुक्त देश करण्यासाठी राष्ट्रीय व राज्य पातळीवर लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहेत. मार्च २०२३ पर्यंत १०० टक्के लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार लसीकरण मोहिमेवर भर देण्यात येत आहे. त्यानुसार नाशिक विभागातील अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यातही आरोग्य विभागातर्फे लसीकरण मोहिम राबवण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामीण भागात ६२.५४ टक्के तर शहरात ५२ टक्के लसीकरण झाले आहेत. विभागात चालू वर्षात तीन लाख ४७ हजार ४० बालकांचा जन्म झाला असून त्यापैकी दोन लाख १० हजार ३५ बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

जिल्हानिहाय लसीकरण असे…
जिल्हा                  बालकांचा जन्म                 लसीकरण
नाशिक                 १,१९,५९०                        ७०,९०७
अहमदनगर           ७६,४६०                         ४५,६०५
धुळे                      ४०,५३०                          २५,०५१
जळगाव                 ७५,७१०                         ४७,५८४

नंदुरबार                 ३४,७५०                          २०,८८८

हेही वाचा :

The post नाशिक विभागात ६० टक्के गोवर लसीकरण; आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर appeared first on पुढारी.