नाशिक : वीज पडल्याने नारळाचे झाड पेटले

वावी www.pudhari.news

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शहा परिसरातील कारवाडी येथे मंगळवारी (दि. 11) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वीज पडून नारळाचे झाड पेटल्याची घटना घडली. शहा-कारवाडी रस्त्यावर संतोष सोपानराव जाधव यांची वस्ती आहे. घराजवळच नारळाची झाडे आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी वार्‍यास सुरुवात झाली. यावेळी वीज जाधव यांच्या नारळाच्या झाडावर कोसळली. त्यानंतर नारळाच्या झाडाने पेट घेतला. आग भडकल्यानंतर मोठ्या प्रमाणात ठिणग्या उडू लागल्या. जाधव यांची वाहने येथे असतात व लहान मुले अंगणात खेळत असतात. मात्र, सुदैवाने त्यावेळी येथे वाहने उभी नव्हती. ब्लोअर मशीनच्या सहाय्याने आग विझवण्यात आली. दरम्यान, या नारळाच्या झाडाला आग लागलेला व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला.

हेही वाचा:

The post नाशिक : वीज पडल्याने नारळाचे झाड पेटले appeared first on पुढारी.