Site icon

नाशिक : वीज वर्कर्स फेडरेशन पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा 

वीज कामगारांची वीज वर्कर्स फेडरेशन पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडल्याने संस्थेचा निवडणुकीवर होणारा खर्च वाचला आहे.

नाशिक जिल्ह्यातील ५३ वर्षापूर्वी स्थापना झालेली वीज कर्मचारी पतसंस्था असून या संस्थेची वार्षिक उलाढाल 39 कोटीपर्यंत आहे. संस्थेची गेली ३० वर्षापासूनची निवडणूक बिनविरोध पार पडत आहे. हीच परंपरा यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीतही तंतोतत पाळली गेली आहे. वीज वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या नेतृत्वाखाली संस्था कामकाज करीत आहे. संघटनेने निवडणून दिलेल्या उमेदवारांना सर्व सभासदांनी झालेल्या बैठकीत मान्यता दिली. त्यात संघटनेने दिलेले त्याची निवडक अर्ज दाखल होते. यावेळी इतर कोणतेही अर्ज दाखल नव्हते. निवडणुक निर्णय अधिकारी सुरेश कासार यांनी निवड यादी प्रसिद्ध केली. यामध्ये नवनिर्वाचित संचालक म्हणुन दिपाली मोगल, प्राची पाटील, नामदेव लभडे, रविंद्र  गुंजाळ, चंद्रकांत जाधव,  सुनिल वाघ, सुरेश उगले, महेश पगारे, भाऊसाहेब कुकडे, दिपक बागूल, प्रदीप मोरे, सोमनाथ चव्हाण, बबन  शिंदे, विष्णु रकिबे, स्वनिल देवरे, गितेश्वर वाधेरे, महेश लांडगे, ज्ञानेश्वर कावळे अशा १८ जागांसाठी बिनविरोध निवड झाली.

वर्कर्स फेडरेशन संघटनाचे व्ही. डी. धनवटे, एस. आर. खतीब,  अरुण म्हस्के, पंडीत कुमावत, दिपक गांगुर्डे, विक्रांत आहेरे, राजेद्र कुलकर्णी, गणेश सुर्यवंशी, महेश कदम, पोपटराव पेखळे, सतीष पाटील, एस आय खान, भास्कर लांडगे, सुनिल मालूंजकर, रघुनाथ ताजनपुरे, दत्ता चौधरी, नारायण देवकाते, सचीन पवार,  रोहीरास पवार, आदिंनी बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार करुन अभिनंदन केले.

हेही वाचा:

The post नाशिक : वीज वर्कर्स फेडरेशन पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध appeared first on पुढारी.

Exit mobile version