Site icon

नाशिक : व्हॉलीबॉल स्पर्धेत जिल्हयातील ३६ महाविद्यालयापैकी एसव्हीकेटीच्या संघाचे अव्वल स्थान

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयातील व्हॉलीबॉल संघाने सिन्नर येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत अव्वल स्थान पटकविले. स्पर्धेत नाशिक जिल्हयातील छत्तीस संघानी सहभाग घेतला होता. यात एसव्हीकेटीने प्रथम स्थान मिळवत विजेतेपद पटकविले आहे.

व्हॉलीबॉलस स्पर्धा सिन्नर येथील जीएमडी महाविद्यालयाच्या मैदानात सोमवारी [ दि. ३१ ] रोजी पार पडली. मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक कृष्णा भगत यांच्या हस्ते उदघाटन झाले. व्दितीय स्थानावर सिडको येथील स्व. शांताराम कोंडाजी वावरे यांनी स्थान पटकविले. अहमदनगर जिल्हयातील कोपरगांव येथे होणा-या विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत या संघाचे खेळाडू सहभागी होणार आहे. याप्रसंगी नाशिक क्रिडा विभागाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ, नाशिक क्रिडा विभागाचे सचिव सुरेश इंगळे, सहसचिव गोकुळ काळे, डॉ. सुरेखा दप्तरे, सोपान जाधव, नामदेव काकड आदी उपस्थित होते. एसव्हीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी विजेता संघ तसेच क्रिडा संचालक नामदेव काकड यांचा सत्कार केला. मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनिल ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपसभापती देवराम मोगल, सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, चिटणीस दिलीप दळवी, संचालक संदीप गुळवे, रविंद्र देवरे, डॉ. सयाजीराव गायकवाड, प्रविण जाधव, अॅड. लक्ष्मण लांडगे, शिवाजी गडाख, अमित बोरसे, डॉ. प्रसाद सोनवणे, ॲड. रमेशचंद्र बच्छाव, नंदकुमार बनकर, कृष्णाजी भगत, विजय पगार, रमेश पिंगळे, श्रीमती शोभा बोरस्ते,  शालन सोनवणे, डॉ. संजय शिंदे, चंद्रजित शिंदे, जगनाथ निंबाळकर आदींनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : व्हॉलीबॉल स्पर्धेत जिल्हयातील ३६ महाविद्यालयापैकी एसव्हीकेटीच्या संघाचे अव्वल स्थान appeared first on पुढारी.

Exit mobile version