नाशिक शहरात दोघांच्या आत्महत्या

विष सेवन, www.pudhari.news

नाशिक : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी आत्महत्या केल्या आहेत. आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र पितांबर गिरी (40, रा. नांदूर नाका) यांनी शुक्रवारी (दि. 1) राहत्या घरात विष सेवन केले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसर्‍या घटनेत देवळाली कॅम्प पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राची विजय भवर (16, रा. जुनी स्टेशनवाडी) हिने शनिवारी (दि. 2) दुपारी राहत्या घरात गळफास घेतला. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक शहरात दोघांच्या आत्महत्या appeared first on पुढारी.