नाशिक : शहरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या 127 वर

swine flue

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येथे डेंग्यू आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, शहरातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या 127 वर पोहोचली आहे. गेल्या शनिवारी (दि.27) शहरात स्वाइन फ्लूमुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला.

ऑगस्टमध्ये आत्तापर्यंत स्वाइन फ्लूचे 97 रुग्ण सापडले आहेत. त्यातील 38 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर तीन महिन्यांत डेंग्यूबाधितांचा आकडा 158 वर पोहोचला आहे. गेल्या एक-दीड महिन्यापासून शहरात स्वाइन फ्लूचा धोका अधिक वाढत चालला आहे. त्यामुळे मनपाचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. मनपाकडून खासगी रुग्णालय तसेच खासगी लॅबमधून दररोज होणार्‍या रक्तचाचण्यांची माहिती मागवली जात आहे. स्वाइन फ्लूमुळे शहरात आतापर्यंत चार रुग्णांचा मृत्यू झाला. जुलैपासून स्वाइन फ्लूच्या संकटाने डोके वर काढले आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत शहरामध्ये स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण आढळून आला नाही. पावसाळा सुरू होताच जून महिन्यात स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण आढळले होते. जुलै महिन्यात रुग्णांची संख्या 28 वर जाऊन पोहोचली. पाठोपाठ ऑगस्ट महिन्यात रुग्णांची संख्या 127 वर जाऊन पोहोचली आहे. जुलै महिन्यात अवघे 28 रुग्ण होते. ऑगस्टमध्ये 97 रुग्ण वाढल्याने स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे.गेल्या शनिवारी (दि. 27) उंटवाडीतील एका 47 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाल्याची नोंद झाली आहे. गेल्या तीन वर्षांनंतर प्रथमच शहरात स्वाइन फ्लूमुळे मृत्यू होणार्‍या रुग्णांची आणि रुग्णांचीही संख्या वाढली आहे. शहरात सध्या खासगी रुग्णालयांमध्ये 38 रुग्ण उपचार घेत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : शहरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या 127 वर appeared first on पुढारी.