नाशिक : शाळेत भरला भाजीबाजार, विद्यार्थ्यांनी गिरविले व्यवहार ज्ञानाचे धडे

चांदवड,www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

हिवरखेडे येथील जिल्हा परिषद शाळेत एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. शिक्षणातून साक्षरतेबरोबर प्रत्यक्ष कृतीतून उत्पादनक्षम शिक्षण व व्यवसायाभिमुखता हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून दप्तर मुक्त शनिवार उपक्रम घेण्यात आला. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी शाळेतच भाजीपाला बाजार भरवला होता. यातून गणन, बेरीज- वजाबाकी व व्यवहार ज्ञान या सर्व बाबींचा प्रत्यक्ष कृतीतून अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.

प्रारंभी माणिक भोईटे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर भाजी बाजाराचे उद्घाटन पोलीस पाटील अनिता जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील शिंदे, उपाध्यक्ष पोपट शिंदे, माजी सरपंच बिंटू भोयटे, सदस्य संतोष शिंदे, सुरेखा शिंदे, बाबू कादरी, कारभारी शिंदे, वर्षा बोरा, भारती शिंदे, निर्मला शिंदे, सुनंदा शिंदे, मधुकर वाळुंज व डॉ. सोनवणे आदीसह मोठ्या संख्येने पालक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.

हा उपक्रम गटशिक्षणाधिकारी संदीपकुमार शिंदे, विस्तार आधिकारी वसंतराव खैरनार, केंद्रप्रमुख सर्जेराव ठोके यांच्या प्रेरणेतून मुख्याध्यापक राहूल कापूरे व शिक्षक राजाराम गुंजाळ, कमल सूर्यवंशी, संध्या देवरे, जयश्री पाटील, सुनील बच्छाव यांनी यशस्वीपणे पार पाडला.

The post नाशिक : शाळेत भरला भाजीबाजार, विद्यार्थ्यांनी गिरविले व्यवहार ज्ञानाचे धडे appeared first on पुढारी.