नाशिक : शिक्षण महोत्सव E -20 मिशनमध्ये तीन उपक्रमांची निवड

नांदगाव जि.प. www.pudhari.news

नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा
शिक्षण महोत्सव E-20 मिशन-२०२३ अंतर्गत नांदगाव शिक्षण विभागाच्या तीन उपक्रमांची निवड करण्यात आली आहे. तर प्राथमिक शिक्षक गटामधून तालुक्यातील प्राथमिक शाळा वडाळी खुर्दचे शिक्षक राजू घोटेकर यांची हसत खेळत इंग्रजी शिक्षण, गवळवाडी शाळेचे प्रवीण पाटील यांचा माझी क्रमवारी या उपक्रमांची निवड झाली आहे. तर अधिकारी वर्गात नांदगावचे प्रभारी गटशिक्षण आधिकारी प्रमोद चिंचोले यांचा बोली भाषेतून प्रमाण भाषेकडे व प्रमाण भाषेकडून आंतरराष्ट्रीय भाषेकडे या उपक्रमाची निवड झाली आहे.

या शिक्षण उत्सवामध्ये जिल्ह्यातील विविध शिक्षक, अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनीही सहभाग घेतला होता. जगातील G-20 चे नेतृत्व करण्याची संधी भारताला मिळाली आहे. त्यामुळे भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्व वाढले आहे. त्याच धर्तीवर शिक्षण क्षेत्रात नाशिक जिल्ह्याचा देखील ठसा उमटावा. या विचारातून Education -20 म्हणजेच E-20 ही संकल्पना उदयास आली आहे. या संकल्पनेतून नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद नाशिकचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, एकूण १५ तालुक्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांच्या उपस्थितीत एलफई मुख्य कार्यकारी दामिनी माईनकर यांनी गुरुवार (दि.२९) रोजी नाशिक जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांच्या उपक्रमांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक अधिकारी व अंगणवाडी कर्मचारी यांच्याकडून उपक्रम सादर करण्यासाठी लिंकद्वारे माहिती मागवण्यात आली होती. लिंकवर २०० च्या वर प्रतिसाद प्राप्त झाले होते. त्यापैकी २० शिक्षक, अधिकारी व अंगणवाडी कर्मचारी यांच्या उपक्रमांची निवड एलएफई व नाशिक जिल्हा परिषदेकडून करण्यात आली होती. यात नांदगाव तालुक्यातील तीन उपक्रमांची निवड झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी नांदगाव शिक्षण विभागाचे कौतुक केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : शिक्षण महोत्सव E -20 मिशनमध्ये तीन उपक्रमांची निवड appeared first on पुढारी.