नाशिक : शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांची यशस्वी घोडदौड

डॉ. अद्वय हिरे-पाटील www.pudhari.news

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा
कर्मवीर भाऊसाहेब हिरे नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघ लि. संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनल विजयी झाले.

नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघातील सोसायटी गटातून माजी आमदार डॉ. अपूर्व प्रशांत हिरे, प्रसाद खैरनार, अ‍ॅड. संदीप गोपाळराव गुळवे, भास्कर नामदेव बनकर, सोमनाथ लहानू मोरे, डॉ. आत्माराम पोपटराव कुंभार्डे, संभाजी साहेबराव पवार, प्रकाश भानुदास कवडे, संदीप मोतीराम पानगव्हाणे, राजेंद्र सदाशिव डोखळे, दिलीप तुकाराम मोरे, निवृत्ती गंगाधर महाले, उषा माणिकराव शिंदे यांची, तर व्यक्तिगत गटातून शिवसेना उपनेते डॉ. अद्वय हिरे-पाटील व बाळासाहेब संपतराव गायकवाड, महिला राखीव गटामधून डॉ. शोभा दिनेश बच्छाव, ललिता बापू देवरे, एन. टी. राखीव गटातून आमदार सुहास द्वारकानाथ कांदे, एस.सी./एस.टी. गटामधून अशोक पुंडलिक आखाडे, इतर मागास वर्ग गटातून पवन यशवंत ठाकरे यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुरेश महंत यांनी कामकाज पाहिले. त्यांना संघाचे कार्यकारी संचालक दिलीप गाडेकर, व्यवस्थापक नितीन हिरे आणि कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. कर्मवीर भाऊसाहेब हिरे नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघावर शिवसेना उपनेते डॉ.अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखाली दशकापासून सत्ता असून, डॉ. हिरे-पाटील हे या संघाचे विद्यमान चेअरमन म्हणून कामकाज पाहत होते.

हेही वाचा:

The post नाशिक : शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांची यशस्वी घोडदौड appeared first on पुढारी.