नाशिक : शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला

मालेगाव बिबट्या www.pudhari.news

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील कजवाडे येथे उन्हाळ कांदा पिकाला पाणी देत असलेल्या शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. वडिलांवर बिबट्याने हल्ला केल्याचे लक्षात येताच मुलाने धाव घेतल्यानेे शेतकरी भरत आहेर (45) यांची बिबट्याच्या तावडीतून सुटका झाली. जखमी शेतकरी आहेर यांच्यावर मालेगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. बुधवारी (दि. 22) गुढीपाडवाच्या पहाटे ही थरारक घटना घडली.

कजवाडे परिसरात कायमच बिबट्याचे दर्शन घडते. एकीकडे शेत शिवारात बिबट्या आणि दुसरीकडे रात्री होणारा थ्री फेज विद्युतपुरवठा या कोंडीत शेतकरी सापडले आहेत. दिवसा होणार्‍या भारनियमनामुळे शेतकर्‍यांना रात्र जागूनच पिके जगवावी लागतात. तीही हिंस्र श्वापदांच्या दहशतीखाली. त्यामुळे दिवसा वीजपुरवठा करुन शेतकर्‍यांना सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी होते. मात्र, ती कायमच दुर्लक्षित राहते. या असंवेदनशीलमुळेच शेतकर्‍यांचा जीव धोक्यात आल्याचा सूर उमटत आहे. शेतकरी भरत आहेर हे रात्री शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. बुधवार (दि.22) सकाळी 6.30 च्या सुमारास त्यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला. त्यांनी आरडाओरडा केला. बाजूच्या शेतातील असलेल्या त्यांच्या मुलाने आवाज ऐकल्याने तो तत्काळ धावून आला, त्यामुळे बिबट्याने धूम ठोकली. मात्र तोपर्यंत बिबट्याने आहेर यांच्या हाताचा लचका तोडला होता. अहिरे यांना जखमी अवस्थेत मालेगावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेे. वन अधिकारी वैभव हिरे यांनी रुग्णालयात जाऊन आहेर यांची विचारपूस केली. शेतकर्‍यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. तसेच महावितरण शेतकर्‍यांना दिवसा थ्री फेज वीजपुरवठा देत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला appeared first on पुढारी.