नाशिक : शोधाशोध…. आणि… जागा मिळेल तिथे पार्किंग…

पार्क www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात एकीकडे रस्ते रुंदीकरण-काँक्रिटीकरण सुरू असताना दुसरीकडे मात्र पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरातील कुठल्याही भागात, कोठल्याही रस्त्यावर वाहन पार्किंगसाठी जागेची शोधाशोध करावी लागते. त्यामुळे जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यात मुख्यत्वेकरून रामकुंड परिसर, रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, अशोक स्तंभ, स्मार्ट रोड, सीबीएस, शिवाजी रोड, शालिमार, मेनरोड या मुख्य बाजारपेठेमध्ये पार्किंगचा बोजवारा उडालेला आहे. अनेक ठिकाणी फूटपाथदेखील पार्किंगने व्यापलेले असतात. ‘नो पार्किंग’ मध्येही वाहने उभी केली जातात. परिणामी, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून, नागरिकांना पायी चालणेदेखील कठीण झाले आहे. मनपा प्रशासनाने मुख्य बाजारपेठेमध्ये सुसज्ज पार्किंगची व्यवस्था करणे गरजेचे आहे. तसेच, टोइंगचाही आर्थिक फटका वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. आधी पार्किंगची व्यवस्था करा, मगच टाेइंगची कारवाई करा, अशा प्रतिक्रिया वाहनधारकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

राममुंड परिसरातील पार्कींग
रविवार कारंजा परिसरातील पार्कींग
स्मार्ट रोड परिसरातील पार्कींग
महात्मा गांधी रोड परिसरातील पार्कींग
स्मार्ट रोडवरील फूटपाथवर देखील वाहनधारकांनी पार्क केलेली वाहने (सर्व छायाचित्रे : रुद्र फोटो)

The post नाशिक : शोधाशोध.... आणि... जागा मिळेल तिथे पार्किंग... appeared first on पुढारी.